परमहंस रामचंद्र महाराज अनंतात विलीन

परमहंस रामचंद्र महाराज अनंतात विलीन

वझेगाव संस्थानच्या परीसरात भक्तांच्या उपस्थितीत दिली समाधी
Published on

बाळापूर (जि.अकोला) : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री श्रेत्र वझेगाव संस्थानचे अवलिया परमहंस श्री रामचंद्र महाराज यांच्यावर सोमवारी (ता. १७ ) दुपारी १ वाजताच्या सुमारास हजारो भाविकांच्या उपस्थितीत संस्थानच्या परीसरातच विधिपूर्वक अंत्यसंस्कार करून समाधी देण्यात आली. Paramahansa Ramchandra Maharaj merged into Infinity

श्री रामचंद्र महाराजांचे सोमवारी पहाटे निधन झाले होते. हजारो भक्तांच्या उपस्थितीत त्यांची विधीवत पूजा करून समाधी बांधण्यात आली. त्यांच्या मृत्यूची बातमी परीसरात वाऱ्यासारखी पसरली. गर्दी होऊ नये म्हणून उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी गावच्या सीमा बंद करून चोख बंदोबस्त ठेवला होता.

परमहंस रामचंद्र महाराज अनंतात विलीन
जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले, कोरोनाने साधला डाव

महाराजांना अखेरचा निरोप देण्यासाठी व दर्शनासाठी गावात सकाळपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली होती. गावाच्या प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त असूनही नदीतून वाट काढत भक्तांनी वझेगाव गाठून महाराजांचे शेवटचे दर्शन घेतले. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यांत महाराजांचे गाव म्हणून वझेगाव ओळख आहे.

परमहंस रामचंद्र महाराज अनंतात विलीन
सावधान; ‘हॅप्पी हायपोक्सिया’ ठरतोय सायलेंट किलर!

तालुक्यातील वझेगाव येथे चैत्र शुद्ध श्रीराम नवमी दुपारी १२ वाजताच्या सुमारास १७ एप्रिल १९४८ रोजी श्रींचा जन्म घुले कुटुंबात झाला. भगवान श्रीकृष्णाप्रमाणे खोड्या करणे, विक्षिप्त वागणे अशा बाललीला वझेगाववासीयांनी सहन करत महाराजांना अंगा खांद्यावर खेळवले. महाराज लहरी होते. त्यांच्या लहरीपणा ओळखून त्यांना ‘लत्या’ हे नाव दिले होते. या लत्यामधील वेगळेपण बालपणापासूनच लोकांना जाणवायला लागल्याने जसजसे चांगल्या-वाईट घटनांचे त्यांच्या कृतीनंतर लोकांना अनुभव यायला लागले तेव्हापासून त्यांच्या आई-वडीलांकडे तक्रारी घेऊन येणाऱ्यांचा तगादा हळूहळू बंद होत गेला. व वझेगाववासियांचा ‘लत्या’ परंतु अवलिया संत ‘परमहंस रामचंद्र महाराज’ हे महाराष्ट्र व राज्या राज्यातील भक्तगणांच्या गळ्यातील ताईत झाले.

संपादन - विवेक मेतकर

Paramahansa Ramchandra Maharaj merged into Infinity

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com