
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील निमखेड येथील सुपुत्र पार्थ मोतीराज चव्हाण यांची सब लेफ्टनंट म्हणून भारतीय नौदला मध्ये निवड झाली आहे. पार्थ चव्हाण हे मूळचे निमखेड (कोथळी) येथील राहणारे असून त्यांचे वडील प्रा. मोतीराज चव्हाण हे नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.