esakal | प्रवाशांची कोंडी; एसटीच्या फेऱ्या रद्द

बोलून बातमी शोधा

प्रवाशांची कोंडी; एसटीच्या फेऱ्या रद्द
प्रवाशांची कोंडी; एसटीच्या फेऱ्या रद्द
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः दुसऱ्या टप्प्यातील कोरोना महामारीला आळा बसावा राज्यासह जिल्ह्यात मिनी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या टाळेबंदीचा मोठा फटका येथील एसटी बससेवेला बसला आहे. एसटीच्या केवळ १० टक्केच फेऱ्या सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सुविधा बंद केल्या आहेत. त्यासोबतच दळणवळण व वाहतुकीच्या सेवांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. कडक निर्बंधांमुळे एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. लांब पल्याच्या गाड्याही बंद असल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ होत आहे. एसटी महामंडळाच्या वतीने केवळ १० टक्केच फेऱ्या चालवण्यात येत असल्याने या कामासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांनाच कामासाठी बोलवण्यात येत आहे.
---------------
प्रवाशांना त्रास
एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या एसटीच्या गाड्यातून त्यांना प्रवास करावा लागत आहे. अनेक गावांना व जिल्ह्यांना जाण्यासाठी एसटीच्या गाड्या नल्याने प्रवाशांना अत्यधिक त्रास सहन करावा लागत आहे.

संपादन - विवेक मेतकर