Akola Daylight Theft: भरदिवसा घरांचे कुलूप तोडून चोरी; दोन वेगवेगळ्या ठिकाणी फोडली कपाटे; पातूरमध्ये चोरांची दहशत
Daylight House Break-Ins Reported in Patur: पातूर शहरात भरदिवसा दोन बंद घरांचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली. चोरट्यांनी लोखंडी कपाटे फोडून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.
पातूर: शहरात चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांनी भरदिवसा बंद घरांना लक्ष्य करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरांचे कुलूप तोडून लोखंडी कपाटे फोडली.