

Patur Municipal Limit Extension Still Pending, Residents Disappointed
Sakal
-गोपाल बदरखे
पातूर (जि. अकोला) : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पातूर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात पातूर नगरपरिषद प्रशासन अपयशी ठरत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असलेली नगरपरिषदेची हद्दवाढ करण्यासाठी चार ते पाच वेळा शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले; मात्र आजवर त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे पातूर नगरपरिषदेची हद्दवाढ म्हणजे केवळ ‘फुग्यातील पोकळ हवा’ ठरत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.