‘आरटीई’चा दोन कोटींचा फी परतावा शाळांना तत्काळ द्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rte

‘आरटीई’चा दोन कोटींचा फी परतावा शाळांना तत्काळ द्या!

अकोला : इंग्रजी शाळांमधील (english school) विद्यार्थ्यांचा थकीत आरटीई २५ टक्केचा सुमारे २ कोटी १९ लाख २३ हजार रुपयांचा फी परतावा या शाळांना तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने जिल्हा परिषद (Zilla Parishad) प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा: जळगाव : एके ४७ रायफल पाहून मुले थक्क

कोरोनामुळे २०२०च्या परीक्षा शासनाने रद्द केल्या. तेव्हापासून इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद आहेत; मात्र शासनाच्या सुचनेनुसार, या कालावधीत शाळांनी ऑनलाईन पद्धतीने मुलांना शिक्षण दिले. तरीही अजूनपर्यंत पालकांकडून या शाळांना फी मिळालेली नाही. त्यामुळे शाळा आणि शिक्षक अडचणीत आले आहेत. दरम्यान, शिक्षण संचालक यांना आरटीई अंतर्गत २५ टक्के फी परतावा योजनेकरिता १८ नोव्हेंबर २०२१ रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागाकडे २ कोटी १९ लाख २३ हजार रूपयांचा निधी पाठविलेला आहे. हा निधी या विभागाला प्राप्त होऊन बरेच दिवसांचा कालावधी उलटला तरी त्याचे शाळांना अजूनही वाटप करण्यात आलेले नाही. त्यानंतर २९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक, पुणे यांनी महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनसोबत बैठक घेतली.

हेही वाचा: जळगाव : एके ४७ रायफल पाहून मुले थक्क

त्यानुसार, संचालक यांनी १५ डिसेंबर २०२१ रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून या संघटनेसोबत बैठक घेऊन ३१ डिसेंबरपूर्वी निधीचे वितरण करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिल्या होत्या. परंतु अजूनही हा हक्काचा निधी न मिळाल्याने शाळा व शिक्षक आर्थिक अडचणीत आले आहेत. याचा दुष्परिणाम शाळांमधील संबंधित घटकांवरही होत आहे. त्यामुळे या शाळांना फी परतावा तात्काळ मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे सदर शाळांना ८ जानेवारी २०२२ पूर्वी हा निधी वितरीत करण्यात यावा अन्यथा १० जानेवारी २०२१ पासून सर्व शाळाचालक आणि शिक्षक प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top