‘पीओपी’च्या मूर्तीवरील विघ्न दूर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Permission to manufacture and sell Plaster of Paris Ganesh Idol with conditions akola

‘पीओपी’च्या मूर्तीवरील विघ्न दूर!

अकोला - केन्‍द्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या २० मे च्या अधिसूचनेनुसार पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्‍यासाठी प्‍लॉस्‍टर ऑफ पॅरीसच्या (पीओपी) वापरास प्रतिबंध करण्यात आले होते. परंतु पर्यावरण समितीच्या बैठकीत २०२२ वर्षाकरीता गणेश उत्‍सव दरम्‍यान प्‍लास्‍टर ऑफ पॅरीसच्‍या मूर्तींची निर्मीती व विक्री करण्‍यास अटीशर्तींसह परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

पीओपीच्या वापरामुळे होणाऱ्या जल व वायु प्रदुषणाचा संभाव्य धोका लक्षात घेवून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. तसेच पर्यावरण संरक्षण कायदा अधिनियम १९८६ मधील तरतूदीनुसार प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तिचे उत्पादन, वितरण व विक्रीस १ मे २०२२ पासून प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले होते. या बाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरीस हद्दपार होण्याच्या दृष्टीने निर्गमित केलेल्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी सन् २०२२ च्या गणेशोत्सवापासून करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. परंतु पर्यावरण समितीच्या बैठकीत २०२२ वर्षाकरीता गणेश उत्‍सव दरम्‍यान प्‍लास्‍टर ऑफ पॅरीसच्‍या मूर्तींची निर्मीती व विक्री करण्‍यास अटीशर्तींसह परवानगी देण्याचे ठरले आहे. त्यामुळे जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या काळात पीओपीच्या मूर्ती विकण्याचा व बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय आहे आदेशात

  •  सन् २०२२ या वर्षाकरिता श्री गणेश यांच्‍या प्‍लास्‍टर ऑफ पॅरीसच्‍या मूर्तींची निर्मीती, वितरण, विक्री आणि खरेदी करण्‍यास दंडात्‍मक कार्यवाहीसह अटी व शर्तींचे अधीन राहून सवलत देण्‍यात येत आहे.

  •  मूर्ति बनविणाऱ्या निर्मात्‍यांनी धर्मदाय आयुक्‍त अथवा महानगरपालिका अकोला व संबंधित नगर परिषद किंवा नगर पंचायत येथे नोंदणी करणे बंधनकारक राहील.

  •  एकूण निर्मीती केलेल्‍या व विक्रीसाठी पीओपीच्‍या प्रतीमूर्तीवर दंडाची रक्‍कम म्‍हणून रक्‍कम ५० रुपये भरणा करणे अनिवार्य राहील. या बाबतची कार्यवाही मनपा आयुक्‍त, संबंधित नगर परिषद व नगर पंचायत, प्रदुषण नियंत्रण मंडळ, गाडगेबाबा प्रतिष्‍ठाण व महसूल विभाग यांनी आवश्‍यक पथकाचे गठण करुन करावी.

  •  मूर्तिकार यांना मूर्ती निर्मीती व विक्रीची सवलत केवळ सन् २०२२ करिता देण्‍यात येत असल्‍यामुळे संबंधित मूर्तिकार यांनी विहित नमून्‍यात प्रतिज्ञालेखासह घोषणापत्र महानगरपालिका, संबंधित नगर परिषद व नगर पंचायत या ठिकाणी सादर करणे बंधनकारक राहील.

  •  सादर केलेल्‍या घोषणापत्राची तपासणी महानगर पालिका, अकोला शहरी व ग्रामीणभागाकरिता संबंधित नगर परिषद व नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी करेल.

  •  एकूण विक्रीसाठी उपलब्‍ध असलेल्‍या पीओपीच्‍या मूर्तिंवर ठळकपणे पीओपी- २०२२ असे मुद्रांकित करणे बंधनकारक राहील.

  •  नमूद केलेल्‍या अटी व शर्तींचे उल्‍लंघन केल्‍यास संबंधित व्‍यक्‍ती नियमानुसार कारवाईस पात्र राहील. संयुक्‍त पथकांचे गठण करुन आदेशाचे उल्‍लंघन करणाऱ्या व्‍यक्‍ती वा प्रतिष्‍ठाणांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

Web Title: Permission To Manufacture And Sell Plaster Of Paris Ganesh Idol With Term And Conditions Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..