
अकोला : राज्यात अशांतता पसरविण्याचा कट; ॲड. आंबेडकर यांचा दावा
अकोला : भोंग्याच्या प्रश्नावर ता. ३ मे रोजीची दिलेली मुदत बघता त्या दिवशी राज्यात अशांतता पसरविण्याचा कट असल्याची भिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. राज्यात शांतता रहावी यासाठी ता. १ मे रोजी सर्व जिल्ह्यात शांती मार्च काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भोंग्याच्या प्रश्नावरून सोमवारी राज्य शासनाने सर्व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत भोंग्याशिवाय दुसरा कोणताही विषय चर्चेला येऊ दिला नाही. आम्ही ता. ३ मे रोजी राज्यात काहीतरी अघटित घडण्याची शक्यता असल्याचा विषय मांडण्याचा प्रयत्न करीत होतो. राज्य शासनातर्फेही ज्या सूचना दिल्या जात आहे, त्यातून यातून याचे गांभिर्य दिसून येते. मात्र, बैठकीत या विषयावर चर्चा होऊ दिली नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
सरकारने भोंग्याच्या बाबत नवीन धोरण करण्यासाठी केंद्र सरकराला आयता विषय दिल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला. यातून त्यांनी शंकेला वाव असल्याचे म्हटले आहे. चौकशीत अडकलेल्या मंत्र्यांना वाचविण्यासाठी भोंग्यांचे नवीन धोरण करून त्यात शिथिलता आणण्यासाठी केंद्र सरकारला संधी दिली असल्याचे ते म्हणाले. याशिवाय भाजपने मनसेमार्फत जी भूमिका घेतली आहे, तिच राज्यातील महाविकास आघाडीची भूमिका आहे, या शंकेलाही वाव असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मनसे राज्यव्यापी पक्ष नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा राज्यव्यापी पक्ष नाही. मुंबईतही सर्व प्रभागात मनसेचा प्रभाव नाही. पण ज्या पद्धतीने भासवले जाते की, राज्यभर ही संघटना मजबूत आहे. मात्र, राज्यभर ही संघटना मोठी नाही. तिचे अस्तित्व काही भागामध्ये प्रभावशाली आहे, याबद्दल दुमत नाही. कोणत्यातरी पक्षाच्या पाठिंब्याशिवाय ती मोठी होऊ शकत नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी करून अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे.
Web Title: Plot Spread Unrest State Prakash Ambedkar Claim Peace March Organized Districts May Maintain Peace State
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..