अकोला : कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाचा ‘नाद खुळा’

सायलेन्सर बदलवून फोडतात फटाके; पोलिसांच्या कारवाईलाही जुमानेना
police action Vehicle Noise ear splitting sound
police action Vehicle Noise ear splitting sound

अकोला : दीड-दोन लाखाची गाडी घेवून तिच्या सायलेन्सरमध्ये बदल करायचा. फटाके फोडत कानठळ्या बसविणारा आवाज करीत शहरातील रस्त्याने फिरयाचे. वाहतूक पोलिस करीत असलेल्या कारवाईलाही हे वाहनधारक जुमानत नसल्‍याचे दररोज होत असलेल्या कारवाईतून दिसून येत आहे. त्यामुळे अशा वाहनधारकांना कायद्याचा जबर ‘हिसका’ दाखविल्याशिवाय आता हे वाहनधारक वठणीवर येणार नाहीत, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

अकोला शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांची वस्ती असणाऱ्या भागात काही खोडकर वाहन चालकांनी वाहनाच्या सायलेन्समध्ये बदल करून फटाके फोडणारे सायलेन्सर बसविले आहे. मुख्यतः बुलेट वाहनात विचित्र प्रकारचे सायलेन्सर बसवून फटाके फोडण्याचे प्रकार अकोला शहरात वाढले आहे.या वाहनाव्दारे होणाऱ्या विचित्र आवाजामुळे इतर वाहन चालक तसेच महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

काही वेळा त्यातून किरकोळ अपघात होऊन इतर वाहनचालकांना दुखापतीचाही सामना करावा लागतो. याबाबत अनेक तक्रारी शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी अशा वाहन चालकांविरुद्ध कारवाईची मोहीमच उघढली आहे. त्यांनी ता.१४ मार्च रोजी सायलेन्सरव्दारे फटाके फोडणाऱ्या बुलेट वाहन तसेच विनापरवानगी वाहनात मोडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही केली. चार वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. मात्र, वारंवार कारवाई होत असतानाही वाहनचालकांकडून नियमांचा भंग करीत कर्णकरकश आवाज करणारे अवैध साहित्य लावून शहरातील नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार थांबलेले नाही.

हवी व्यापक मोहीम

कर्णकरकश आवाज करणारे वाहन शहरातील सायलेन्स झोनमधूनही कानठळ्या बसविणारा आवाज करीत फिरतात. अशा वाहनांवर कारवाईसाठी वाहतूक शाखेने मोहीम राबविली असली तरी ही कारवाई पुसेशी नसल्याचे दिसून येते. त्यासाठी आता संपूर्ण शहरभर व्यापक कारवाईची गरज आहे. वाहन चालकांसोबतच अशा प्रकारे वाहनांचे सायलन्सर बदविणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केल्याशिवाय शहरातील हे प्रकार थांबणार नाहीत.

ना नंबर प्लेट, ना कागदपत्रे

वाहनात फटाके फोडणारे सायलेन्सर किंवा कर्णकश आवाज करणारे हाॅर्न लावणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी दिला आहे. यातील वहुतांश वाहनांवर ना नंबर प्लेट असते, ना चालकाकडे त्या वाहनाची अधिकृत कागदपत्रे आढळतात. त्यामुळे अशा चालकांवर कठोर कारवाई पोलिसांनी केल्याशिवाय शहरातील अशा प्रकारांना आळा बसणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com