पोलिसांची राहणार मद्यपी वाहन चालकांवर नजर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police keep an eye drunk drivers Breath Analyzer police akola

पोलिसांची राहणार मद्यपी वाहन चालकांवर नजर!

अकोला : यावर्षी होळीनंतर रंगपंचमी आणि शब-ए-बारात हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहर वाहतूक शाखेने रंगपंचमीला मद्यपी वाहनचालकांवर विशेष लक्ष्य केंद्र करण्यासाठी बंदोबस्त केला आहे. चौका-चौकात बॅरिगेट्‍स लावून व ब्रीथ ॲनालायझरद्वारे तपासणी करून हुल्लडबाजांवर कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यात धुलीवंदन व शब-ए-बारात हे दोन्ही उत्सव शुक्रवार, ता. १८ मार्च रोजी साजरे होत आहे. एकाच दिवशी दोन्ही उत्सवासाठी बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिस दलापुढे आहे. या दिवशी अकोला शहरात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.अकोला जिल्ह्यात सर्व पोलिस स्टेसनच्या हद्दीत मुख्य चौकांमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला व जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमार्फत विशेष मोहीम व नाकाबंदी करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली.

..तर होईल वाहन चालकांवर कारवाई

वाहतूक पोलिसांनी चौका-चौकात हुल्लडबाजांवर कारवाई करण्यासाठी बंदोबस्त केला आहे. ज्यामध्ये दारू पिवून वाहन चालविणारे व्यक्ती, ट्रीपल सिट बसवून वाहन चालविणारे, मोबाईल फोनवर बोलताना वाहन चालविणारे, अती वेगाने संशयीत रित्या वाहन चालविणारे, महिलेची छेडखाणी करून पळणारे यांच्यावर नाकांबदी दरम्यान कठोर कारवाई केली जाणार आहे.

मद्यपी आढळल्यास रुग्णालयात तपासणी

दारू पिवून वाहन चालविणाऱ्या चालकांची ब्रीथ ॲनालायझरव्दारे तपासणी केली जाणार आहे. त्यांना सरकारी रुग्णालयात नेवून तपासणी करून कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल. महिलेची छेडखानी करून महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या हुल्लडबाजांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शहरातील बंदोबस्त वाढविला

शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोलातर्फे धुलीवंदन व शब-ए-बारात निमित्त अकोला शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर व चौकात बॅरिगेटींग केले जाणार आहे. येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ११० अमलदार शहरातील सर्व पॉईंटवर बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे.

धुलीवंदन व शब-ए-बारात बंदोबस्त एकाच दिवशी येत आहे. या उत्सवादरम्‍यान नागरिकांनी शांततेने व नियमांचे अधिन राहून पोलिसांना सहकार्य करावे. काही अप्रीय घटना घडल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

- विलास पाटील, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, अकोला

Web Title: Police Keep An Eye Drunk Drivers Breath Analyzer Police Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top