Hemant Sapkal
sakal
अकोला - पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली अघोरी पूजा करून हेमंत प्रफुल्ल सपकाळ (वय २९, रा. मोठी उमरी, अकोला) याचा नरबळी दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्यानंतर या प्रकरणात नवनवीन बाबी समोर येत आहेत. हेमंतच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या सिव्हिल लाइन्स पोलिसांनी चौकशीसाठी तिघांना बोलावले होते. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात हस्तक्षेप करीत जादूटोणाविरोधी कायद्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात समितीच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.