अकाेला : पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात धावली बस

अकोट बसस्थानकाला आले पोलिस छावणीचे स्वरूप
Police raids Arrangements run st bus stop the police camp Format
Police raids Arrangements run st bus stop the police camp Formatsakal
Updated on: 

अकोट : गत दीड महिन्यापासून परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन चालू आहे. संप चालू करणारेच या संपामधून बाहेर निघाल्याने अकोला जिल्ह्यातील अकोला आगार दोन अकोला-शेगाव, अकोला-बाळापूर आणि अकोला-बाळापूरसाठी बस धावल्या. सोमवारी (ता. २७) पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात अकोट आगारातील बस अकोट-अकोलासाठी सोडण्यात आली. यावेळी आगाराला छावणीचे स्वरूप आले होते.

Police raids Arrangements run st bus stop the police camp Format
नांदेड : ओमिक्रॉनच्‍या पार्श्‍वभूमीवर नियमावली जाहीर

अकोट आगारातून बस सोडल्यामुळे काही प्रमाणात प्रवाशांनी सुटकेचा श्‍वास सोडला. खासगी वाहतूक धारकांकडून दैनंदिन होत असलेली लूट आता थांबणार असल्याचे काही प्रवाशांकडून बोलल्या जात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठीच अकोला आगार दोन मधून बस क्र.एमएच-११-बीएल-९२३१ अकोट-अकोला फेरीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. सलग दुसऱ्या दिवसीही या बसची सेवा कायम होती. त्यामुळे गत दीड महिन्याच्या मोठ्या कालावधीनंतर अकोट आगारातून एसटीची रुतलेली चाके पुन्हा धावू लागले. पोलिसांचा यावेळी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्याने बस स्थानकाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अकोला येथून ही बस अकोट येथे सुरक्षित पोहचली मात्र, यावेळी बस फेरीला प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. वाहक आडे व चालक एस.दौड यांनी सलग दुसऱ्या दिवशी अकोट आगारात बस आणली. एकाद्या मोठ्या व्यक्तीला देण्यात येत असलेले पोलिस संरक्षण बसला दिले असल्याने सर्वांचे लक्ष बस कडे वेधले जात होते.

Police raids Arrangements run st bus stop the police camp Format
नियमांनुसारच करा नववर्षाचे स्वागत

प्रवाशांचा मनात अजून भीतीच

अकोट-अकोला आगारातून सोडण्यात आलेल्या बसमध्ये पाहिजे तसे प्रवासी बसून आले नसल्याने ही बस फेरी एसटीच्या तोट्याची ठरली. गुरुवारी (ता. २३) अकोला-शेगावसाठी सोडण्यात आलेल्या बसवर एका अज्ञात दुचाकीस्वाराकडून दगडफेक झाल्याने काही प्रवासी अजूनही एसटी प्रवास करायला घाबरत असल्याचे काही प्रवाशांकडून बोलले जात आहे.

"बस ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाची आहे हे गत दीड महिन्याच्या कालावधीत सर्वांना समजले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत आपले काहीही मत नाही. परंतु, बस चालू झाल्याने खासगी वाहतूक धारकांकडून होत असलेली लूट थांबणार आहे."

-मिलिंद देशपांडे, ज्येष्ठ नागरिक, अकोट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com