Akola News : ‘त्या’ पाच पोलिस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ मेहेरबान; सीआयडी तपासावर प्रश्‍नचिन्ह

अकोला - जिल्हयातील अकोट पोलिस स्टेशनमध्ये संशयीत आरोपीचा कस्टडीत मृत्यूप्रकरणी पोलिस उपनिरिक्षकासह हेड कॉन्स्टेबलसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Deceased in Akot Police Station
Deceased in Akot Police Stationsakal

अकोला - जिल्हयातील अकोट पोलिस स्टेशनमध्ये संशयीत आरोपीचा कस्टडीत मृत्यूप्रकरणी पोलिस उपनिरिक्षकासह हेड कॉन्स्टेबलसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी चंद्रप्रकाश सोळंके (पोहेकॉ) व पिएसआय राजेश जवरे यांना अटक करण्यात आली आहे. मात्र दुसरे दोघे अद्यापही फरार आहेत.

एफआयआरमध्ये चार आरोपींचा उल्लेख असतानाही मागील पंधरा दिवसांपासून सीआयडी ‘त्या’ दोघांचा शोध लावू शकली नसल्याने सीआयडी तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे घटनेपासून अकोट पोलिस ठाण्यातील पाच पोलिस कर्मचारी गायब असल्याची चर्चा अकोला पोलिस दलात आहे.

प्रसिद्‍ध हिंदी चित्रपटात गुन्हेगारी प्रवृती ठेचून काढण्यासाठी पोलिस यंत्रणा काम करते. या चित्रपटात एका आरोपीला पोलिस कस्टडीतच एका आरोपीला मारले जाते असा एक प्रसंग आहे. याला अनुरूपच ही अकोट पोलिस ठाण्यातील ही घटना मिळतीजुळती आहे. येथेही पोलिसांनी आपल्या शक्तीचे प्रदर्शन दाखवले. मात्र कायदा कुणालाच सोडत नाही.

या घटनेतील पोलिसही आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला असून अटक आहे. या गंभीर घटनेची दखल घेवून फिर्यादीच्या मागणीनुसार सिआयडीकडे तपास सुपूर्द करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये चार आरोपींचा उल्लेख आहे. मात्र दोघांचीच नावे समोर आली असून अन्य दोघांचा शोध लावण्यात आयपीएस अनमोल मित्तल यांच्याप्रमाणेच सिआयडीलाही जमू शकले नसल्याची वास्तविकता आहे. त्यामुळे सिआयडीच्या तपासावरही फिर्यादीने आक्षेप घेतला असून सीबीआयची मागणी करणार असल्याचे सांगितले.

सीआयडी तपास सुद्‍धा संथगतीने

सुरुवातीच्या काळात या घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी (आयपीएस) अनमोल मित्तल यांनी केला. त्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झाले. त्यापैकी पीएसआय जवरे व चंद्रप्रकाश सोळंके यांना अटक झाली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर फिर्यादीच्या मागणीनुसार प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला.

मात्र सीआयडी सुद्धा संथगतीने तपास करीत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडी एसपी अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधिक्षक दीप्ती ब्राम्हणे ह्या करीत आहेत. सीआयडी तपास संथगतीन होत असल्याने फिर्यादी सुखदेव हरमकार (तक्रारदार) यांनी सीबीआय तपासाची मागणी केली आहे.

ते ‘पाच’ पोलिस कर्मचारी गायब

अकोला लोकसभा निवडणूक काळात कोणतीही पुर्वसुचना न देता अकोट पोलिस ठाण्यातील ‘पाच’ पोलिस कर्मचारी या गंभीर घटनेपासून पोलिस ठाण्यात दिसले नाही. ते कुठे आहेत याची नोंद अकोट पोलिस ठाण्यात नाही. निवडणूक काळात गैरहजर असणाऱ्या या पाच पोलिसांवर वरिष्ठ पोलिस अधिकारी मेहेरबान कसे असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com