

अकोला : गत आठवड्यापासून शहरातील खडकी, कौलखेड, मलकापूर भागातील नागरिक महावितरणच्या लपंडावामुळे वैतागून गेले आहेत. गुरुवारची रात्र नागरिकांना अंधारातच काढावी लागली. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर नागरिकांनी महावितरणच्या हेल्पलाईनवर संपर्क केल्यानंतर तक्रार तर घेण्यात आली मात्र तीचे निरसन होवू शकल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे.