वाहाळा गावातील वीजपुरवठा खंडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभियंत्यांकडे मांडली कैफियत; चौकशीचे आदेश

वाहाळा गावातील वीजपुरवठा खंडीत

अकोला : पातुर तालुका येथील वाहाळा गावात अनेक दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत होत होता. त्याच्या वारंवार तक्रारी करून सुद्धा ग्रामस्थांना दिलासा मिळत नव्हता सदर परिसरातील ५० ते ६० हेक्टर जमिनीवर गहू, हरभरा, तुरीची लागवड केली आहे; परंतु वीजपुरवठा खंडीत असल्यामुळे शेताला पाणी मिळत नसल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

याबद्दलची तक्रार विद्युत अधिकाऱ्यांकडे केली असता ग्रामस्थांना अटाळी सब स्टेशन तालुका खामगाव जिल्हा बुलडाणा येथील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत सतत टाळत आले. त्यामुळे ग्रामस्थांनी सदर प्रकरणाची तक्रार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे यांच्याकडे केली असता त्यांच्यासमवेत गावातील शिष्टमंडळ व अकोला शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे पाटील तसेच प्रदेश समन्वयक महेंद्र गवई यांनी विद्युत भवन अकोला येथे येथे परिमंडळाचे अधिकारी अनिल डोये यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी जिल्हा कार्यकारी अभियंता पवन कुमार कच्छोट व ग्रामीण विभाग प्रभारी अभियंता पानपाटिल यांना संपूर्ण प्रकरणाचा तपास करून योग्य ती तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

हेही वाचा: कोणतेही कागदपत्र नसणाऱ्या 18 वर्षावरील लाभार्थ्यांसाठी 19 ला लसीकरण

त्या अनुषंगाने अकोला जिल्हा ग्रामीण पातुर डिव्हिजनचे अधिकारी संतोष खुमकर यांना बोलावून तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करून देण्याकरिता सांगितले. याप्रसंगी वितरण कंपनीचे अधिकरी यांनी कृषी वीज देयके थकीत कास्तकारांना जेवढे बिल भराल तेवढी माफी या योजने संबंधी माहिती दिली. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकाश तायडे यांनी केले. गावातील ग्रामस्थ शेकोड्याचा संख्येने उपस्थती होते. काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने सहदेव वासुदेव देठे, कृष्णराव पाटील, सोपान अवधूत मोरे, रमेश शिरसाट, मुरलीधर बोरसे, गजानन अवातीरक, महादेव मोरे ,भगवान भोकरे, ज्ञानदेव देठे, शिवदास सोहळे, नीलेश कोडे, शैलेश मोरे, विनोद मोरे, प्रमोद बुटे, महादेव शालिग्राम देठे, भागवत बोरसे, सचिन उमाळे, विश्वनाथ गवई, शुद्धोधन इंगळे, श्रीराम उमाळे, प्रकाश मोरे, वासुदेव, भास्कर चिकटे, विनय मोरे, मंगेश मोरे, नीलेश मोरे, राजाराम मस्के, शंकर ढोरे, सुभाष हागे, राजेंद्र मोरे, संजय ठाकरेसह गावातील संपूर्ण शेतकरी वर्ग उपस्थित होता.

loading image
go to top