कोणतेही कागदपत्र नसणाऱ्या 18 वर्षावरील लाभार्थ्यांसाठी 19 ला लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

कोणतेही कागदपत्र नसणाऱ्या 18 वर्षावरील लाभार्थ्यांसाठी 19 ला लसीकरण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज शुक्रवारी (ता. 19) 18 वर्षावरील ज्या नागरीकांकडे आधार कार्ड, पॅनकार्ड, किंवा कोणतेही ओळखपत्र/ कागदपत्र नाही अशा बेघर, भटक्या, फिरस्ती, मजूर, कामगार इत्यादी नागरिकांना कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन केलेले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य संस्था यांच्यामार्फत ज्या नागरीकांकडे आधार कार्ड, पॅनकार्ड, किंवा कोणतेही कागदपत्र नाही अशा लाभार्थ्यांसाठी सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत कोविड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसकरीता ऑनस्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.

हेही वाचा: नागपूर : ‘बिन फ्री’च्या नादात शहरच झाले ‘डस्टबिन’

ज्या नागरिकांकडे ओळखपत्र नाही, अशा नागरिकांनी जवळपासच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. अधिक माहितीसाठी स्थानिक आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, शिक्षक या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्याकडून माहिती घ्यावी.

उद्या ओळखपत्र नसलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेने सहभागी व्हावे. जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी यासाठी विशेष प्रयत्न करावेत व जास्तीत जास्त गरजू लाभार्थीचे माहिती देऊन त्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

loading image
go to top