
मलकापूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोझरी येथे शेतकरी, सर्वसामान्य जनता, अपंग बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी गत् चार दिवसांपासून अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मलकापूर तालुका व शहर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात आज ११ जून रोजी चक्क बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन करीत शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले व त्यानंतर तहसील कार्यालया समोर साखळी उपोषणास सुरूवात करण्यात आली.