

Purandar Airport Pune Land Acquisition Update Collector Confirms Compulsory Process With No Developed Plot Benefit for Owners
esakal
-योगेश फरपट
अकोला : गेल्या ४२ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या अकोल्यातील धम्म मेळाव्याला यंदा लाखोंच्या जनसमुदायाची उपस्थिती लाभली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी देशातील राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीसह राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, जातिव्यवस्था आणि लोकशाहीपुढील आव्हानांवर भाष्य केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत देण्याऐवजी झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई द्यावी आणि मदतीची आकडेवारी दिवाळीपूर्वी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.