Prakash Ambedkar Sajid Khan
Prakash Ambedkar Sajid Khan esakal

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांविषयी वापरले अपशब्द; साजिद खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 'या' दिवशी सुनावणी

याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात (Dabki Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.
Published on
Summary

अतिरिक्त सत्र न्यायाधीश शायना पाटील यांच्या न्यायालयात साजिद खान यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता.

अकोला : शहरातील मौलाना हाफीज नजीर यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याविषयी अपशब्द वापरणारा फरार आरोपी साजिद खान पठाणच्या जामीन अर्जावर 24 मे रोजी सुनावणी होणार आहे.

साजिद खान (Sajid Khan) यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौलाना हाफीज नजीर यांच्या मोबाईलवर फोन करून त्यांना शिवीगाळ केली, तसेच माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरले. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात (Dabki Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. साजिद खानची कृती दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Prakash Ambedkar Sajid Khan
'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

अतिरिक्त सत्र न्यायाधीश शायना पाटील यांच्या न्यायालयात साजिद खान यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज निकाली न काढता थेट 20 मे सुनावणीची तारीख ठेवली होती. जिल्हा न्यायाधीश श्रीमती पाटील आज रजेवर असल्यामुळे जिल्हा सत्र न्यायाधीश क्षीरसागर यांच्याकडे पदभार होता.

Prakash Ambedkar Sajid Khan
Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

आज आरोपीतर्फे राजेश जाधव तर तक्रारकर्ते गजानन गवई यांच्या वतीने अॅड. चंद्रकांत वानखडे, अॅड. नरेंद्र बेलसरे तर सरकारतर्फे अॅड. आकोटकर हजर झाले. फिर्यादीच्या वतीने दाखल केलेल्या वकील पत्रावर 50 पेक्षा जास्त वकिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वंचितच्या वतीने आज साजिद खान याच्यावर दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याची यादीच न्यायालयात सादर करण्यात आली. यावर आरोपीच्या वकिलांनी युक्तीवादास वेळ मागितला. 24 मे रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. घटनेपासून (15 मे) आरोपी फरार असल्यामुळे पोलिस याचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com