Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

दिव्यातील मतदारांचे (Diva Voters) नेहमीचे मतदान केंद्र बदलल्याने नाराजीचा सूर आहे.
Election Commission
Election Commissionesakal
Summary

दिव्यातील स्टेशनच्या परिसरात राहणाऱ्या दिवा पश्चिम भागातील नागरिकांना दिवा पूर्वेतील शाळांमधील मतदान केंद्र आल्याने तेथे त्यांना पोहोचणे आज जिकरीचे झाले.

दिवा : दिव्यातील मतदारांचे (Diva Voters) नेहमीचे मतदान केंद्र बदलल्याने नाराजीचा सूर आहे. दिव्यातील गेल्या 30 ते 40 वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांचे मतदान ते स्वतः रहात असलेल्या ठिकाणापासून नेहमी लांब येत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. दर निवडणुकीच्या (Election Commission) वेळी मतदान केंद्र बदलल्याने नागरिकांची मतदान केंद्रावर पोहोचायला दमछाक होताना दिसत आहे.

दिव्यातील स्टेशनच्या परिसरात राहणाऱ्या दिवा पश्चिम भागातील नागरिकांना दिवा पूर्वेतील शाळांमधील मतदान केंद्र आल्याने तेथे त्यांना पोहोचणे आज जिकरीचे झाले. दिव्यातील किमान 20 ते 30 टक्के नागरिकांना दर निवडणुकीला मतदान केंद्रे ही बदलून आल्याने दिव्याचा मतदानाचा टक्का हा वाढत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांना त्यांच्या घरापासून 1 ते 2 किलोमीटर पायपीट करुन मतदान केंद्रावर पोहोचावे लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Election Commission
'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संथ्येच्या निवडणुकीच्या वेळी नागरिकांची मतदान केंद्रावर पोहोचणे म्हणजे एक दिव्य असल्याचे नागरिक सांगतात. प्रत्येक वेळी आमचा राहता पत्ता बदलून येतो, नावात चुका असतात, फोटो चुकीचे असतात तर निवडणूक कार्डावर लिंग बदल ही झालेला असतो. किती ही वेळा चुका दुरुस्त केल्या तरी निवडणूक कार्डामध्ये बदल होत नाही. तसेच 5 ते 6 वेळा मतदानाचा फोर्म भरला तरी मतदान कार्ड येत नाही. आले तर ते चुकीचे येते. हा सर्रास प्रकार होतो असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Election Commission
Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

आज दिव्यातील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बरीच पाटपीट करावी लागली. दिवा पश्चिमच्या नागरिकांना मतदानासाठी दातिवली, मुंब्रा देवी कॉलनी, नॅशनल शाळा आणि दिवा हायस्कूलला जावे लागले. तर दातिवलीतील नागरिकांना दिवा पश्चिमच्या पालिका शाळेत, मुंब्रा देवी कॉलनी तर दिवा हायस्कूल पर्यंत तंगडतोड जावे लागले. त्यामुळे काही नागरिकांनी मतदान न करणे ठरवले तर काहिंनी निवडणुक आयोगा विरोधात नाराजी व्यक्त केली.

Election Commission
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील 'या' सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; पाहा Photo

मी दिव्यातील पूर्वेत असणाऱ्या साबे गावात लग्न करुन 22 वर्षांपूर्वी आली. तेव्हा पासून माझे मतदान केंद्र हे दिवा पश्चिमच्या गावदेवी मंदिर जवळ असणाऱ्या पालिका शाळेत येते. पण यावर्षी मतदान यादीत माझे नावच आले नसल्याने मी प्रथमच मतदानपासून वंचित राहिल्याने नाराजी व्यक्त करते.

-रजनी प्रवीण बार्शीकर, स्थानिक रहिवाशी

उन्हाचा त्रास नको म्हणून सकाळीच मी घराबाहेर पडून घराजवळ नेहमी मतदान करणाऱ्या केंद्रावर पोहोचलो. तेथे मतदान केंद्राच्या जवळील बुथवर जाऊन माझे मतदार यादीत नाव शोधले असता ते नाव तेथील केंद्रा नसून 1 ते 2 किलोमीटर लांब दुसऱ्या मतदान केंद्रात असल्याचे मला कळताच मी घरी गेलो. नंतर संध्याकाळी 5 वाजता मी जाऊन मी मतदानाचा हक्क बजावला.

-श्रीकांत गावडे, नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com