Akola Accident : इंदोर ते अकोला जाणारी खाजगी ट्रॅव्हल बस कोसळली करोली घाटात

इंदोर ते अकोला जाणारी खाजगी ट्रॅव्हल बस बुऱ्हाणपूर ते जळगाव जा दरम्यान करोली घाटात 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली.
Akola Accident
Akola Accidentsakal

इंदोर ते अकोला जाणारी खाजगी ट्रॅव्हल बस बुऱ्हाणपूर ते जळगाव जा दरम्यान करोली घाटात 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली.ही घटना 27 एप्रिल चे पहाटे 5 ते 6 वाजे दरम्यान घडली असून बस मध्ये 40 ते 45 प्रवासी होते. सुदैवाने जीवित हानी नसून जखमी ना उपचारासाठी नेण्यात आले.

प्राप्त माहिती नुसार इंदोर वरून अकोला येणारी( रॉयल ट्रॅव्हल ) मध्यप्रदेश मधील शिकारपूरा पोलीस स्टेशन हद्दीतील कोरोली घाटात जास्वंदी आदिवासी गावाजवळ दरीत कोसळली. या मध्ये महाराष्ट्रात येणारे 40 ते45 प्रवासी संख्या असल्याचे समजते.

Akola Accident
Akola News : पराभवाच्या भीतीनेच भाजपकडून जनतेची दिशाभूल; प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके ह्यांचा आरोप

बस कोसळल्या ची माहिती मिळताच जास्वंदी येथील सरपंच शब्बीर तडवी यांनी नागरिकांसह घटनास्थळी धाव घेतली. आणि जखमी ना बस मधून काढून उपचारासाठी ग्रामपंचायत मध्ये व्यवस्था करून चाय पाणी नास्टा दिला. तातडीने शिकारपुरा पोलीस ही घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य केल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com