अकोला व औरंगाबाद जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला प्रोत्साहन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

कायम मागासलेला भाग म्हणून विदर्भ, मराठवाडा ओळखला जातो. या भागात उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न राज्य व केंद्र शासनाकडून होत आहे. आता अकोला व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करण्या संदर्भात चाचपणी केली जात आहे.

अकोला : कायम मागासलेला भाग म्हणून विदर्भ, मराठवाडा ओळखला जातो. या भागात उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न राज्य व केंद्र शासनाकडून होत आहे. आता अकोला व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करण्या संदर्भात चाचपणी केली जात आहे. उद्योजकांनी पुढे येऊन रोजगार निर्मिती करावी यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे.

 

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्ग देशातच प्रत्येक वस्तू निर्माण करण्याचा प्रयत्न येत्या काळात केला जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. त्यातच एक भाग म्हणून अकोला आणि औरंगाबाद येथे इलेट्रॉनिक वस्तू निर्मिती उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांना आवाहन केले जात आहे. त्या दृष्टीने चाचपणी करण्याच्या उद्देशाने केंद्रीय मानव संसाधन, इलेक्ट्रॉनिक व माहित तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक मंत्रालयाचे सचिव सौरभ गौड यांनी उद्योगपती, व्यापाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

 

कृषी आधारित उद्योगांना इलेक्ट्रॉनिक उद्योगाची जोड
अकोला जिल्हा कृषी उत्पादन आधारित उद्योग-व्यवसाय करणारा आहे. त्याला इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. ‘नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स-2019’ या अंतर्गत मॉडिफाइड स्पेशल इन्सेन्टिव्ह स्कीम (एमएसआयपीएस), इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट फंड आदींच्या माध्यमातून उद्योजकांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

 

उद्योजकांवर सवलतींचा वर्षाव
- पीएलआय योजनेत बेस उत्पादनाच्या पुढील पाच वर्षांच्या कालावधीत पात्र ठरलेल्या कंपन्यांना भारतात उत्पादित आणि उद्दीष्ट विभागांतर्गत व्यापलेल्या वस्तूंच्या वाढीव विक्रीवर (बेस वर्षापेक्षा जास्त) 4 ते 6 टक्के प्रोत्साहन दिले जाईल.
- एसईपीईसीएस इलेक्ट्रॉनिक वस्तू, अर्थात इलेक्ट्रॉनिक घटक, सेमीकंडक्टर, डिस्प्ले फॅब्रिकेशन युनिट्स, असेंब्ली, टेस्ट, मार्किंग अँड पॅकेजिंग (एटीएमपी) युनिट्स, विशेष उपअसेंब्ली आणि भांडवली वस्तूंच्या २५ टक्के भांडवलाच्या खर्चासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
- जागतिक स्तराच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर गुंतवणुकीचा संधी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Promotion of electronic sector in Akola and Aurangabad districts