esakal | मानवी साखळीद्वारे लॉकडाउनचा निषेध

बोलून बातमी शोधा

मानवी साखळीद्वारे लॉकडाउनचा निषेध
मानवी साखळीद्वारे लॉकडाउनचा निषेध
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लावण्यात आलेल्या लाकडाउनचा राज्यातील सर्वच शेतकरी, व्यापारी, फळे-भाज्या विक्रेते, किरकोळ दुकानदार आणि हातावर पोट असणारे व्यावसायिक यांनी विरोध केला आहे. ता.१ मे नंतरही लॉकडाउनचे निर्बंध कडक करण्यात आला आहे.

त्यामुळे ता. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी राज्यभर मानवी साखळी करून लॉकडाउनचा तीव्र निषेध करण्यात येणार असल्याची घोषणा किसान ब्रिगेडचे संस्थापक प्रकाश पोहरे यांनी केली आहे.