या जिल्ह्यातील 23 एएसआय बनणार पीएसआय

भगवान वानखेडे
Friday, 31 July 2020

अकोला जिल्ह्यातील 23 सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यांना पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळणार आहे. यासंदर्भात 1985-88 च्या बॅचच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांचे माहिती मागवून त्यांचे अर्ज भरवून घेतले आहे.

अकोला  ः अकोला जिल्ह्यातील 23 सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यांना पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळणार आहे. यासंदर्भात 1985-88 च्या बॅचच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांचे माहिती मागवून त्यांचे अर्ज भरवून घेतले आहे.

अकोल्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांनी काही वर्षापूर्वी परीक्षा दिली होती. त्यानुसार त्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा होती. आता हेच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पोलिस उपनिरीक्षक बनणार आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पदोन्नती मिळालेल्यांमध्ये मो.रफिक अ. माजिद, अस्लम खान जब्बार खान, विनायक साहेबराव देशमुख, गणेश रामभाऊ पाचपोर, प्रदीप निवृत्ती व्यवहारे, सुनिल मोतीराम अहिर, प्रभाकर मनोहर मोगरे, दिवाकर वासुदेव नांदगाये, भगवंत शेषराव पाटील, शशिकांत रामभाऊ इंगळे, नरेंद्र महादेव पदमने, विजय रामराव पाटील, गणेश मोतीराम चोपडे, गंगाधर पंडित चौधरी, दिनकर पांडुरंग गुडधे, अरुण बलभीम गायकवाड, अशोक रामप्यारे मिश्रा, मो. अफरोज शेख, गोपाल नामदेव दातीर, सुरेश मनोहर वाघ, चंद्रकांत मोतीराम खंडारे, संजय सुपडू सोनवणे, दिलीप दत्तप्रसाद तिवारी यांना पदोन्नती मिळणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Psi to be 23 ASIs in Akola district