वामनाच्या हाकेला पुणेकर संवगड्याची साद, शाहीर वामन वाणी यांच्यासाठी पुणे गोपाळ समाज संघटनेने पुरवली रसद

राम चौधरी
Friday, 31 July 2020

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाउनमुळे सलग चार महिन्यापासून हाताला काम नसल्यामुळे समाजातील सर्वच घटकांचे अतोनात नुकसान झाले तर, हातावर पोट असणारा सर्वसामान्य मजूर पुरता होरपळून निघाला आहे.

वाशीम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाउनमुळे सलग चार महिन्यापासून हाताला काम नसल्यामुळे समाजातील सर्वच घटकांचे अतोनात नुकसान झाले तर, हातावर पोट असणारा सर्वसामान्य मजूर पुरता होरपळून निघाला आहे.

वाशीम तालुक्यातील बाभुळगाव येथील प्रख्यात ग्रामीण कलाकार वामन वाणी (शाहीर) यांनी अलीकडे कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर गीत गायन करून माध्यमातून प्रसिद्ध केले होते. घरची हलाखीची परिस्थिती असताना देखील शाहीर वाणी यांनी कोरोना काळात आपल्या कलेतून सामाजिक प्रबोधन केले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

ऐन लग्नसराईत लॉकडाउन लागल्याने शाहीर वाणी यांची देखील परवड झाली होती. माध्यमातून प्रसिद्ध झालेली ही बाब पुणे गोपाळ समाज संघटनेच्या लक्षात येताच पुणे अध्यक्ष भाऊसाहेब चौगुले, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष नंदकुमार पवार, मार्गदर्शक दत्तात्रय चौगुले आणि गोपाळ समाज संघटनेच्या इतर पदाधिकारी व सदस्यांनी थेट पुण्याहून रसद पाठवीत एका वंचित ग्रामीण कलाकाराच्या कलेला साद देत माणुसकीचे दर्शन घडवीले.

पुणे नी दोन महिने पुरेल ईतके धान्य, किराणा आणि कपड्याची भेट जिएसएमच्या स्थानिक पदाधिकारी यांच्या हस्ते वामन वाणी यांस सुपूर्द केले. यावेळी राज्यकार्यकारिणी सदस्य शंकर कालापाड, जिल्हाध्यक्ष गजानन कुंभार, बालाजी घोडके यांच्यासह बाभुळगाव येथील नागरिक उपस्थित होते. ग्रामीण बोलित प्रबोधन करून कलेचा वारसा पुढे नेणाऱ्या शाहीर वाणी यांच्या कुटुंबानी पुणे जीएसएम प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
(संपादन -  विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Gopal Samaj Sanghatana provided supplies for Shahir Waman Vani