
बनावट शेती उत्पादने, खते रसायने कारखान्यावर छापा
अकोला : जिल्ह्यातील सीसा बोंदरखेडा रोडवरील एका शेतात विनापरवाना शेती उत्पन्न वाढ़विनारे खते, टॉनिक बनवणाऱ्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापेमारी करून आरोपीस अटक केली. या कारवाईत पाच लाख रुपयांचे साहित्य जप्त केले. डोंगरगांव सांगळुद रोडावरिल सीसा बोंदरखेडा शेतशिवारातील एका शेतात विनापरवाना शेती उत्पन्न वाढ़विनारे खते, टॉनिक बनवणाऱ्या कारखाना चालविला जात असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापेमारी केली.
आरोपी विनोद ज्ञानदेव हिवराळे वय 33 वर्ष रा बोथाकाजी जि. बुलडाणा हा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता शेतीचे उत्पन्न वाढविणारे उत्पादने बनवत होता. पथकाने त्याच्या ताब्यातून रेस गोल्ड, गोल्डन प्लस, प्लेटिना प्लस, पॉवर बुस्ट,3D प्लस, कॉटन पीजीआर, असे शेती प्रॉडक्ट बनविणारे साहित्य असा एकूण 5 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरोधात बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 420, , जीवनाशयक वस्तु अधिनियम कलम 3,7 ईसी कायदा, तसेच खत नियंत्रण आदेश 1985, सन 7, 35 , 21 या मी करून देतो तुला कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विलास पाटील, जिल्हा कृषि अधीकारी एम, बी इंगळे, मिलिंद जवंजाळ, मोहिंम अधिकारी संजय गवळी, ग्राम विकास अधिकारी यांनी केली.
Web Title: Raid On Counterfeit Agricultural Products Fertilizer Chemicals Factory Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..