gift of lanterns to Chief Executive engineer
gift of lanterns to Chief Executive engineersakal

Akola News : पाऊस येते तासभर, लाईन जाते रात्रभर...

प्रहारकडून महावितरण अधिकाऱ्यांना दिले कंदील भेट!

अकोला - जुने शहरातील विज पुरवठा हा नेहमीच खंडित होत असून, ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आज अकोला प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगर पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले.

सध्याचे बदललेले वातावरणामुळे अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण होऊन वादळी हवा व पाऊस आल्यावर रात्रभर वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे रात्रभर वीज खंडित होण्याचे नेमके कारण समजत नसून रात्री वीज खंडित झाल्यावर महावितरण कडून नेमलेल्या कर्मचाऱ्यांना जुने शहरातील नागरिकांनी संपर्क केला असता ते कुठलाही प्रतिसाद देत नाहीत.

यामुळे सततच्या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याला त्रासलेल्या नागरिकांनी मनोज पाटील यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. यावर प्रहारच्या मनोज पाटील यांनी योग्यरित्या लक्ष केंद्रित करून संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात आले व सोबतच अश्या परिस्थितीत जुने शहर परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

महावितरण जेव्हा थकित कर वसुली करीता आले असता तेव्हा महावितरणचे कर्मचारी त्या ग्राहकावर तात्काळ कार्यवाही करून त्यांच्या घरातील विज पुरवठा खंडित करून टाकतात. त्याचप्रमाणे जेव्हा वीज पुरवठा खंडित होते तेव्हा महावितरण याबाबतीतही योग्यते कार्यवाही का करत नाही? असा प्रश्न मनोज पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला.

तरी आपण थोडीही हवा किंवा पाऊस आल्यावर अशी कुठली समस्या निर्माण होऊन रात्रभर वीज पुरवठा खंडित होत असेल तर याचे नेमके कारण शोधून आपण या समस्येचे निराकरण करावे, अन्यथा लोड शेडिंग जाहीर करा. किंवा यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करू असा इशारा प्रहारच्या वतीने देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com