
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्यादरम्यान (ता. ११ जून) झालेल्या जाहीर सभेस वेगळीच पार्श्वभूमी लाभली. पावसाच्या सरी, गर्दीचा प्रचंड ओघ आणि त्यात अढळ राहिलेला पोलिसांचा कणखर बंदोबस्त. अकोला पोलिसांनी पावसाची तमा न बाळगता आपले कर्तव्य निष्ठेने निभावले आणि संयम व सजगतेचा आदर्श घालून दिला.