प्रत्येक दुकानदाराची रॅपिड अँटिजेन टेस्ट करा; आमदार रणधिर सावरकर यांचे आरोग्य केंद्राला निर्देश

अनुप ताले
Sunday, 19 July 2020

एखादा दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह किंवा वाहक असल्यास त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात कोरानाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खडकी भागातील सर्व दुकानदारांची, विक्रेत्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करा, असे निर्देश आमदार रणधिर सावरकर यांनी खडकी/सिंधीकॅम्प नागरी आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले. शुक्रवारी (ता.१७) खडकी नागरी आरोग्य केंद्रामध्ये आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

अकोला : एखादा दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह किंवा वाहक असल्यास त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात कोरानाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खडकी भागातील सर्व दुकानदारांची, विक्रेत्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करा, असे निर्देश आमदार रणधिर सावरकर यांनी खडकी/सिंधीकॅम्प नागरी आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले. शुक्रवारी (ता.१७) खडकी नागरी आरोग्य केंद्रामध्ये आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
 

परिसरातील नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

या विषयाचा घेतला आढवा
आढावा बैठकीत आमदार रणधिर सावरकर यांनी आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून परिसरातील लोकसंख्या किती, आरोग्य केंद्रांतर्गत किती कर्मचारी, आशा काम करतात, कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न सुरू आहेत, नागरिकांच्या प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या आहेत का, परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण किती, बरे झालेले किती याबाबत आढावा घेतला. त्यानंतर कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, परिसरात तत्काळ सर्व्हे करण्याचे व त्यानंतर येथील प्रत्येक दुकानदाराची, विक्रेत्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

यांच्या उपस्थितीत झाली बैठक
या बैठकीला एसडीएम डॉ. निलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे, नगरसेवक विनोद मापारी, नगरसेविका शारदा ढोरे यांचे पती वैकुंठ ढोरे, नगरसेवक विजय इंगळे, मेडिकल ऑफिसर डॉ.विजय चव्हाण, नागरी आरोग्य केंद्राचे सुपरवायझर अजय गावंडे, योगेश माल्टे, एस.आय. सुनील खेते आदी अधिकारी, कर्मचारी, आशा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rapid Antigen test every shopkeeper, Akola MLA Randhir Savarkar instructs health center