केशरी कार्डधारकांसाठी पुन्हा खुशखबर...

सुगत खाडे
Tuesday, 14 July 2020

एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्तीमागे देण्याच्या निर्णयाला राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार 444 केशरी कार्डधारकांना जुलै व ऑगस्ट महिन्यांसाठी सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात येईल. त्याचा लाभ केशरी कार्डमध्ये नाव सामविष्ट असलेल्या 6 लाख 5 हजार 454 लाभार्थ्यांना मिळेल. 

अकोला : एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्तीमागे देण्याच्या निर्णयाला राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार 444 केशरी कार्डधारकांना जुलै व ऑगस्ट महिन्यांसाठी सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात येईल. त्याचा लाभ केशरी कार्डमध्ये नाव सामविष्ट असलेल्या 6 लाख 5 हजार 454 लाभार्थ्यांना मिळेल. 

एपीएल (केशरी) मधील ज्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच 14 जिल्ह्यातील शेतकरी योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नाही, अशा एपीएल (केशरी) मधील लाभार्थ्यांना माहे मे व जून 2020 या दो महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला होता.

टाळेबंदीच्या काळात सदर निर्णयाचा जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांना लाभ मिळाला. परंतु त्यानंतर मात्र शासनाने पुढील महिन्यात धान्य वाटप करण्याचे जाहीर केले नाही. दरम्यान 10 जुलैरोजी शासनादेश जारी करुन केशरी शिधापत्रिकाधरकांना जुलै व ऑगस्ट महिन्यासाठी धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याअंतर्गत एपीएल (केशरी) मधील लाभार्थ्यांना गहू 8 रुपये प्रतिकिलो व तांदुळ 12 रुपये प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ या प्रमाणे 5 किलो अन्नधान्य देण्यात येणार आहे. 

जिल्ह्यासाठी तीन हजार मेट्रीक टन धान्य 
दोन महिने जिल्ह्यातील लाभार्थ्यांना धान्य देण्यासाठी शासनाने 1 हजार 816 मेट्रीक टन गहू व 1 हजार 211 मेट्रीक टन तांदुळाचे नियतन मंजुर केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना लवकरच सवलतीच्या दरात धान्य मिळले. 

अशी आहे जिल्ह्याची स्थिती 
- केशरी कार्डधारक - 1 लाख 40 हजार 444 
- लाभार्थी सदस्य - 6 लाख 5 हजार 454 
- मिळणारे धान्य - 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ (प्रती व्यक्ती) 
- सवलत मूल्य - गहू 8 रुपये व तांदुळ 12 रुपये प्रतिकिलो 

सवलतीत मिळणार पुन्हा धान्य
जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार 444 केशरी कार्डधारकांना जुलै व ऑगस्ट महिन्यासाठी सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्यात येणार आहे. यासंबंधी शासनाने आदेश दिले आहेत. जुलै व ऑगस्ट महिन्यांसाठी सदर धान्य देण्यात येईल. 
- बी.यू. काळे 
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ration grain to orange card holders again in akola

Tags
टॉपिकस
Topic Tags: