मनावर दगड ठेवून वाचा... कोरोना कसा करतोय गेम!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनामुळे सोमवारी (ता. 1) एका 58 वर्षीय महिलेचा उपचार घेताना मृत्यू झाला, तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 24 रुग्णांची भर पडली, तर 34 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 24 रुग्णांची भर पडल्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 604 झाली आहे. तर प्रत्यक्षात 140 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. 

अकोला : जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनामुळे सोमवारी (ता. 1) एका 58 वर्षीय महिलेचा उपचार घेताना मृत्यू झाला, तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 24 रुग्णांची भर पडली, तर 34 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 24 रुग्णांची भर पडल्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 604 झाली आहे. तर प्रत्यक्षात 140 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. 

देशभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने जिल्ह्यात सुद्धा धुमाकूळ घातला आहे. कोरोना संसर्गामुळे सोमवारपर्यंत (ता. 1) जिल्ह्यात 605 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अकोला शहर व जिल्हा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 33 रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. त्यामधील एका रुग्णांने आत्महत्या सुद्धा केली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांनी सहाशेचा आकडा गाठला असला तरी 432 रुग्णांनी कोरोनावर मात सुद्धा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या 140 रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे. 

हे ही वाचा : टिलेटर वाचवतात प्राण तरी प्रशासनाला नाही जाण...

12 पुरुष, 12 महिलांची भर
सोमवारी (ता. 1) 85 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 24 अहवाल पॉझिटिव्ह तर 34 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह आढळलेल्या अहवालांमध्ये 12 महिला व 12 पुरुषांचा समावेश आहे. त्यात पाच जण रामदास पेठ येथील, तीन जण हरिहरपेठ येथील, दोन जण कमलानगर, दोन जण आंबेडकर नगर येथील तर उवरित खैर मोहम्मद प्लॉट, सिंधी कॅम्प, खदान, गुरुनानक नगर कौलखेड, रणपिसेनगर, मुजफ्फरनगर, अनकट पोलिस लाईन, नूरानी मस्जिद जवळ खदान, खडकी, सरकारी गोदाम खडकी, भरतनगर व पोपटवाडी मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत.

संदर्भित महिलाच ठरली बळी
सोमवारी (ता. 1) मृत्यूमुखी पडलेल्या 58 वर्षीय महिलेला नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी संदर्भित करण्यात आले होते. तिचा रविवारी (ता. 31 मे) मृत्यू झाला. सदर महिला 26 मे रोजी दाखल झाली होती. तिला 29 मे रोजी नागपूर येथे हलविण्यात आले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: read how to spread corona virus in akola