लघु व्यावसायिकांवर फिरत्या पथकाकडून डल्ला; वसुली आणि दंडाच्या नावावर होतेय लूट

Recovery is being made from small traders on the road by the municipal team
Recovery is being made from small traders on the road by the municipal team

बुलडाणा : कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे लघु व्यावसायिक आधीच आर्थिक संकटात आहेत. त्यातच नगर पालिकेच्या भरारी पथकाकडून रस्त्यावरील लघु व्यावसायिकांची विनाकारण आर्थिक लूट केली जात आहे. सर्व नियमांचे पालन करत असतानाही या व्यावसायिकांकडून सक्तीने वसुली केली जात असल्याची तक्रार शहर राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाधिकारी व मुख्याधिकार्‍यांकडे करण्यात आली असून संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी केली आहे.

फूल नको, आम्हाला वेळेवर वेतन द्या; कोरोना योध्दाच वेतनापासून वंचित
 
या संदर्भात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. निवेदनात नमुद आहे की, गेल्या एका वर्षापासून सततच्या लॉकडाऊनमुळे शहरातील लघु व्यावसायिक आर्थिक अडचणीत आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार देखील हिरावला आहे. काहींनी बँक, पतसंस्थांकडून कर्ज घेऊन, हातउसणे पैसे घेऊन कसाबसा रस्त्यावर लघु व्यवसाय सुरू केला आहे. सध्या शहरात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व व्यवसायांना परवानगी आहे.

सर्व व्यावसायिक हे प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत असतानाही नगर पालिकेच्या भरारी पथकातील कर्मचारी लघु व्यावसायिकांना विनाकारण त्रास देत आहेत. त्यांच्याकडून सक्तीची वसुली केली जात आहे, त्यामुळे लघु व्यावसायिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. १४ मार्च रोजी देखील असाच प्रकार उघड झाला. भरारी पथकातील कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी लघु व्यावसायिकांकडून सक्तीची वसुली करताना आढळून आले, याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. लघु व्यावसायिकांची लूट करून त्यांना विनाकारण त्रास देणार्‍या या कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर, राजेश गवई, विशाल फटाद, मनोज चंदन, अंबरीष घोडके, संजय मुठ्ठे, श्रीराम देशमुख, शे. सत्तार, गौरव देशमुख, संतोष पवार आदींनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com