...अन् मृत्यूनंतरही मृतदेहांची अवेहलना

मृत्यू व्यक्तीवर अंत्यसंस्कार स्मशानभूमीत करण्यासाठी रस्ताच नसल्याने मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना व गावकर्‍यांना मरणयातना भोगाव्या लागल्या.
स्मशानभूमी
स्मशानभूमीsakal

घाटबोरी (जि. बुलडाणा) : जीवन जगत असताना शेवट तरी, गोड व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु, मेहकर तालुक्यातील बर्‍याच गावातील गावातील ग्रामस्थांना हे भाग्य नसल्याचे आता समोर येत असून, यातील एक गाव अकोला ठाकरे. एकीकडे सुसाट वेगाने रस्ते निर्मितीसाठी धावपळ करणारे नेते मंडळी आहे तर दुसरीकडे ५ वर्षांनी दर्शन देऊन मतांचा जोगवा मागत फिरणारे पुढारी. परंतु, यात वंचित राहतो तो सर्वसामान्य.

मेहकर तालुक्यातील अकोला ठाकरे गटग्रामपंचायत विकासापासून कोसोदूर असल्यामुळे मृत्यू व्यक्तीवर अंत्यसंस्कार स्मशानभूमीत करण्यासाठी रस्ताच नसल्याने मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना व गावकर्‍यांना मरणयातना भोगाव्या लागल्या. मृत व्यक्तीवर सन्मानाने अंत्यसंस्कार व्हावे, अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. मात्र, प्रशासकीय लालफीताशाहीला मानवतेचा कळवळा असतोच,असे नाही.पर्यायाने मृत्यूनंतरही येथील व्यक्तीच्या मृत्यदेहाची अंत्यसंस्कारासाठी हाल अपेष्टा होत असतील तर आपले दुर्दैवच म्हणावे लागेल.

२२ सप्टेंबरला अकोला ठाकरे येथील भूमिहीन वयोरुध्द रामचंद्र गणपत खोलागडे अल्पशा आजाराने निधन झाले. पावसामुळे गावातील रस्ते चिखलमय झाल्याने अशा परिस्थितीत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तावर गुडघाभर पाणी व चिखलाची दलदल पाहून, चार खांदेकर्‍यांच्या ऐवजी गावकर्‍यांनी तिरडी ट्रॅकरमध्ये टाकून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रस्थान केले.

स्मशानभूमी
Video: बुमरा का जबाव नहीं! KKRच्या गिलची 'अशी' केली दांडी गुल

त्यातच ट्रॅक्टर सुद्धा रस्त्यात फसले व पुन्हा मृत्यदेह ट्रॅकरमधून रस्त्यावर खाली काढण्यात आला परत कसेमसे टॅक्टर चिखलातून बाहेर काढून परत तो मृत्यदेह ट्रॅकरात टाकून स्मशानभूमीत नेला व तेथे त्या टिनपत्राच्या शेडमधून पाणी मृत्यदेहावर पडत असल्याने बिकट परिस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. खरतर माणसांच्या मृत्यदेहाची ऐवढी अवेहलना होत असेल तर येथील प्रशासन काय झोपा काढते की काय?दर पाच वर्षांनी लोकप्रतिनिधींनी मताचा जोगवा मागायचा अन् फोटो शूट करून विकासाच्या गप्पा मारायच्या असा प्रश्न यानिमित्ताने येथील नागरिक उपस्थित करत आहेत.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

गट ग्रामपंचायत मधील अकोला ठाकरे गावाला स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही तर खामखेड गावाला स्मशानभूमीच नाही. गावातील अनेकांच्या पिढ्या गेल्या मात्र या गटग्रामपंचायतीमध्ये अकोला ठाकरे ला रस्ता नाही. लोकप्रतिनिधींकडून कुठलाही पाठपुरावा नसल्याने ही समस्या कायम आहेत.

स्मशानभूमी
MI vs KKR Live: अय्यर, त्रिपाठीची अर्धशतके; मुंबईला धुतलं!

अधिकाऱ्यांची टाळाटाळ

मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशीष पवार यांच्या सोबत संपर्क साधला असता ते व्यस्त असतात व फोन वर प्रतिक्रिया देण्याचे टाळाटाळ करतात. विस्तार अधिकारी शिवाजी गवई सोबत संपर्क केला असता तालुक्यातील स्मशानभूमीची आकडेवारी आमच्या कडे उपलब्ध नाही म्हणून वेळ मारून नेला.

"येथील स्मशानभूमीचा रस्ता पावसामुळे चिखलमय झाल्याने रामचंद्र खोलागडे यांचा मृत्यदेह ट्रॅकरात टाकून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी नेत असताना गावकर्‍यांचे प्रचंड हाल झाले. या स्मशानभूमीपासी अनेकांनी अतिक्रमण केल्याने गावकर्‍यांना अंत्यसंस्काच्या वेळी अडचणी येतात. त्यामुळे शासन-प्रशासनाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करत येथील अतिक्रमण हटवण्यात यावे."

- विश्राम ठाकरे, माजी सरपंच, अकोला ठाकरे

"अकोला ठाकरे येथील स्मशानभूमीच्या रस्त्यावर पावसामुळे पाणी साचून रस्ते चिखलमय झाल्याने अंत्यसंस्काच्या वेळी नागरिकांचे हाल झाले. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जि.प.कडे पाठपुरावा चालू आहे. डिमांड टाकलेली आहे लवकरच रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल."

- गजानन मवाळ, ग्रामविकास अधिकारी, गट ग्रामपंचायत, अकोला ठाकरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com