IPL2021: KKRच्या वादळात मुंबई उद्ध्वस्त; 'Top 4'मध्ये प्रवेश

KKR-V-Iyer-Rahul-Tripathi
KKR-V-Iyer-Rahul-Tripathi
Summary
  • व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठीची झंजावाती अर्धशतके

IPL 2021 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: मुंबईविरूद्धच्या सामन्यात कोलकाताच्या युवा खेळाडूंनी केलेल्या झंजावाती खेळीच्या जोरावर KKRने ७ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या (५५) जोरावर ६ बाद १५५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा सलामीवीर व्यंकटेश अय्यर याने ३० चेंडूत ५३ धावांची धडाकेबाज खेळी केली. तर राहुल त्रिपाठीने ४२ चेंडूत ७४ धावा कुटल्या. कोलकाताच्या वादळी खेळीपुढे मुंबईच्या स्टार गोलंदाजांचाही निभाव लागला नाही. त्यामुळे, कोलकाताने विजय मिळवत नेट रनरेटच्या जोरावर Top 4 मध्ये प्रवेश केला आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सला खाली ढकलले.

पाहा सामन्यातील ठळक घटना-

IPL2021: KKRच्या वादळात मुंबई उद्ध्वस्त; 'Top 4'मध्ये प्रवेश

KKRच्या वादळात मुंबई उद्ध्वस्त; 'Top 4'मध्ये प्रवेश

दमदार खेळीनंतर व्यंकटेश अय्यर बाद

दमदार खेळीनंतर व्यंकटेश अय्यर बाद

३० चेंडूत ५३ धावांची तुफानी खेळी करणारा व्यंकटेश अय्यर जसप्रीत बुमराहच्या संथ गतीने टाकलेल्या चेंडूचा शिकार ठरला. अय्यरने ४ चौकार आणि ३ षटकार खेचत कोलकाताला विजयासमीप नेले.

अय्यर पाठोपाठ त्रिपाठीचंही दमदार अर्धशतक

अय्यर पाठोपाठ त्रिपाठीचंही दमदार अर्धशतक

व्यंकटेश अय्यर पाठोपाठ राहुल त्रिपाठीनेही तुफान फटकेबाजी करत आपलं अर्धशतक साजरं केलं. ३१ चेंडूत त्याने ६ चौकार आणि २ षटकार खेचत अर्धशतकी मजल मारली.

व्यंकटेश अय्यरचं २५ चेंडूत अर्धशतक; मुंबईला धुतलं

कोलकाताचा सलामीवीर व्यंकटेश अय्यर याने जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अडम मिल्न, कृणाल पांड्या आणि राहुल चहर या पाचही स्टार गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. त्याने २५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार खेचत आपलं धडाकेबाज अर्धशतक साजरं केलं.

शुबमन गिल माघारी; बुमराहने केली दांडी गुल

शुबमन गिल माघारी; बुमराहने केली दांडी गुल

कोलकाताचे सलामीवीर शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर या दोघांनी तुफानी सुरूवात करत ३ षटकात ३८ धावा कुटल्या होत्या. पण बुमराहने गिलला चतुराईने गोलंदाजी करत त्रिफळाचीत केले. गिलने ९ चेंडूत १३ धावा केल्या.

डी कॉकचा धमाका; KKR पुढे १५६ धावांचे आव्हान!

डी कॉकचा धमाका; KKR पुढे १५६ धावांचे आव्हान!

शेवटच्या षटकांमध्ये कायरन पोलार्ड आणि कृणाल पांड्याकडून फटकेबाजीची अपेक्षा होती, पण त्यांना फारशी छाप पाडता आली नाही. पोलार्ड २१ तर कृणाल १२ धावांवर बाद झाला. क्विंटन डी कॉकने डावात सर्वाधिक ५५ धावा केल्या. त्या जोरावर मुंबईने कोलकाताला १५६ धावांचे आव्हान दिले. KKR कडून प्रसिद्ध कृष्णा आणि लॉकी फर्ग्युसनने २-२ तर सुनील नारायणने १ बळी टिपला.

डी कॉक, किशन बाद; धडाकेबाज पोलार्ड मैदानात

डी कॉक, किशन बाद; धडाकेबाज पोलार्ड मैदानात

क्विंटन डी कॉक पाठोपाठ इशान किशनही बाद झाला. किशनला मोठी खेळी करता आली नाही. त्याने १३ चेंडूत एका षटकारासह १४ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर धडाकेबाज कायरन पोलार्ड आणि कृणाल पांड्या मैदानात उतरले.

दमदार अर्धशतकानंतर क्विंटन डी कॉक माघारी!

दमदार अर्धशतकानंतर क्विंटन डी कॉक माघारी!

धडाकेबाज अर्धशतक ठोकणारा मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉक ४२ चेंडूत ५५ धावा काढून बाद झाला. त्याने आपली खेळी ४ चौकार आणि ३ षटकारांनी सजवली. डी कॉकला प्रसिद्ध कृष्णाने झेलबाद करत माघारी धाडले.

डी कॉकचं दमदार अर्धशतक; मुंबईची शतकी मजल!

डी कॉकचं दमदार अर्धशतक; मुंबईची शतकी मजल!

मुंबईचा तडाखेबाज सलामीवीर क्विंटन डी कॉक याने ३७ चेंडूत तुफान फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं. त्यासोबतच त्याने पुढच्या चेंडूवर चौकार लगावत संघाचं शतकही साजरं केलं.

MI vs KKR Live: सूर्या स्वस्तात माघारी; मुंबईला दुसरा धक्का!

MI vs KKR Live: सूर्या स्वस्तात माघारी; मुंबईला दुसरा धक्का!

खेळीतील सातत्यासाठी प्रसिद्ध असलेला सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाला. तो १० चेंडूत ५ धावांवर खेळत असताना प्रसिद्ध कृष्णाच्या एका आऊटस्विंगरने त्याचा बाद केले.

मुंबईला मोठा धक्का; रोहितला नारायणनं केलं बाद

मुंबईला मोठा धक्का; रोहितला नारायणनं केलं बाद

अफलातून लयीत फलंदाजी करत असलेला रोहित शर्मा अखेर मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. सुनील नारायणच्या गोलंदाजीवर त्याने सीमारेषेवर झेल सुपूर्द केला. रोहितने ४ चौकारांसह ३० चेंडूत ३३ धावा केल्या.

MI vs KKR Live: रोहित शर्मा-क्विंटन डी कॉकची तुफान फटकेबाजी!

रोहित शर्मा-क्विंटन डी कॉकची तुफान फटकेबाजी!

रोहित शर्माने वरूण चक्रवर्तीच्या षटकात चौकारांची आतषबाजी केल्यानंतर क्विंटन डी कॉकने वेगवान गोलंदाजांना सीमारेषेपार पोहोचवले. त्यामुळे पॉवर-प्लेच्या ६ षटकांमध्ये मुंबईने बिनबाद ५६ धावांपर्यंत मजल मारली.

रोहितच्या सणसणीत चौकाराने मुंबईच्या डावाची सुरूवात

कर्णधार रोहित शर्माने सणसणीत चौकाराने डावाची सुरूवात केली. फिरकीपटू नितीश राणाला पहिलं षटक टाकायला दिलं. त्यावेळी रोहितने शानदार चौकार मारत दमदार सलामी दिली.

Toss Update

कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या संघात एकही बदल झालेला नाही. पण मुंबईच्या संघात कर्णधार रोहित शर्मा परतला असल्याने अनमोलप्रीतला संघातून वगळण्यात आले आहे.

पाहा, MI vs KKR सामन्याआधीचे Points Table

सध्या मुंबईचा संघ ८ पैकी ४ विजय मिळवून ८ गुणांसह चौथा आहे. तर कोलकाताचा संघ ८ पैकी ३ विजय मिळवून ६ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. प्ले-ऑफ्सच्या स्पर्धेत कायम राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे.

IPL Points Table
IPL Points Table

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com