Akola Police
sakal
अकोला - नवरात्रीच्या शुभपर्वावर अकोला जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. हरवलेले मोबाईल, चोरीस गेलेली वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ कोटी २८ लाख ९० हजार ४६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी शोधून काढत मूळ मालकांना परत केला. यामध्ये ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे. पोलीस लॉन येथे आयोजित कार्यक्रमात अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते हा मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द करण्यात आला.