election voting
sakal
अकोला - राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ६) मुंबईत २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील तीन नगर परिषदांसह दोन नगर पंचायतींवर महिलाराज राहणार असून मूर्तिजापूर व पातूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.