मूर्तिजापूर (जि. अकोला) - शहराच्या दर्यापूर मार्गावरील प्रभाग क्रमांक दोनमधील नागसेननगर व गोकुल ढुसा परिसरात गेल्या ४० वर्षांमध्ये पिण्याचे पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे या भागातील हजारो नागरिक तहानलेले असून, पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.
मूर्तिजापूर शहराला बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा जल प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. प्रकल्पाचे पाणी शहराच्या गोयनका नगरातील जलकुंभात जलवाहिनीद्वारे आणले जाते. तेथून शहराच्या विविध भागात भूमिगत जलवाहिनीतून वितरित केले जाते. शहराचा काही भाग या पाण्यापासून वंचित राहतो.