सिनेमागृहांवर निर्बंध; ५० टक्क्यांची मर्यादा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Restrictions on cinemas 50 percent Limits
सिनेमागृहांवर निर्बंध; ५० टक्क्यांची मर्यादा

सिनेमागृहांवर निर्बंध; ५० टक्क्यांची मर्यादा

अकोला : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट (third wave of corona in india) रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांची झुंबड उडू नये यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व सिनेमा हॉल, ऑडिटोरियम या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात शनिवारी (ता. ८) आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार सिनेमा, थिएटर्स, मल्टीप्लेक्स, प्रेक्षागृहाची व्याप्ती एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी, असा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.

हेही वाचा: अकोला : दीड लाख नागरिकांचे दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष!

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. त्यामुळे लोकांच्या गर्दीला आकर्षित करतात अशा सिनेमा हॉल, नाट्यगृह या मनोरंजन केंद्रांच्या बस्दीस्त जागेवर कोविड विषाणूचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सिनेमा, थिएटर्स, मल्टीप्लेक्स संदर्भात निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार सदर आदेशाची अंमलबजावणी ८ जानेवारी पासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू राहील.

हेही वाचा: नांदेड : विद्यार्थ्यांना मिळाली अत्याधुनिक शस्त्रांची माहिती

 • सिनेमा, थिएटर्स, मल्टीप्लेक्स, प्रेक्षागृहाची व्याप्ती एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी.

 • जिल्ह्यातील सर्व सिनेमा हॉल चालकांनी, मालकांनी सिनेमा बघण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची

 • आरटीपीसीआर किंवा रॅपिड टेस्ट करावी.

 • आरटीपीसीआर किंवा रॅपिड टेस्टसाठी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी

 • महापालिका यांच्यासोबत संपर्क करावा.

 • प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्र केल्याबाबतचे प्रमाणपत्र

 • सोबत ठेवणे बंधनकारक राहील.

 • प्रेक्षक तसेच कर्मचारी यांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.

 • दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी सहा फुटांचे सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी.

 • विक्री काउंटरवर गर्दी टाळण्यासाठी तिकीट, पॅकिंग केलेले खाद्यपदार्थ व पेये इत्यादीच्या पेमेंटसाठी कॉन्टॅक्टलेस

 • डिजीटल व्यवहारांच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येवे, यासह इतर अटी व शर्तींचा उल्लेख करण्यात आला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top