विद्यार्थ्यांना मिळाली अत्याधुनिक शस्त्रांची माहिती | Weapons | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Students get sophisticated Weapons information
विद्यार्थ्यांना मिळाली अत्याधुनिक शस्त्रांची माहिती

नांदेड : विद्यार्थ्यांना मिळाली अत्याधुनिक शस्त्रांची माहिती

अर्धापूर : अश्रू धुरांच्या नळकांड्या, विविध प्रकारच्या बंदुका, शिरस्त्राण, आदी पोलिस दलात वापरण्यात येणारी शस्त्र व‌ पोलिस नाईक ते राज्यांचे पोलिस महासंचालकां पर्यंची पद रचना व त्यांच्या कार्याची माहिती शालेय विद्यार्थ्यांना शनिवारी (ता.आठ) मिळाली. विद्यार्थ्यांनी या शस्त्राचे‌ कुतुहलाने निरीक्षण केले. निमित्त होते पोलिस स्थापन सप्ताहाचे.

हेही वाचा: कोरोनामुळे चित्रीकरणावर परिणाम

पोलिस स्थापनादिनाचे औचित्य साधून अर्धापूर पोलिस ठाण्याच्या वतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या निमित्ताने पोलिस प्रशासनाने विविध उपक्रम राबविले. शहरातील बसवेश्वर विद्यालयात पोलिस स्थापन सप्ताहाच्या निमित्ताने पोलिस विद्यार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंडितराव लंगडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक अशोक जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने, बळीराम राठोड, कपील आगलावे, महंमद तय्यब, डॉ. विशाल ल़ंगडे, निळकंठ मदने, लक्ष्मीकांत मुळें गुणवंत विरकर, उद्धव सरोदे, दिगांबर मोळके, शंकर ढगे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या विरोधात धडक कारवाई

या मेळाव्याचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रघुनाथ शेटे यांनी करून पोलिस स्थापन दिन व दर्पण दिनानाचे महत्त्व पटवून दिले व या दोन्ही घटकांची समाजाच्या निकोप वाढीसाठी खूप मोठे महत्त्व असल्याची माहिती दिली. पोलिस निरिक्षक अशोक जाधव यांनी पोलिस दलातील विविध पदांची, गणेश, परिक्षा पध्दत आदी संबंधी माहिती सखोल माहिती दिली. पोलिस जमादार वारणे यांनी शस्त्रांची माहिती दिली. मुख्याध्यपिका आर.पी. बिराजदार यांनी आभार मानले. हा कार्याक्रम यशस्वी करण्यासाठी पवार, पिंपरे, नवनाथ ढगे, वाघमारे यांनी पुढाकार घेतला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top