Illegal Sand Mining: वाळूची अवैध वाहतूक; तीन टिप्पर पकडले, सिंनगाव जहागीर येथे महसूल विभागाची कारवाई
Revenue Department: सिनगाव जहागीरमध्ये महसूल विभागाच्या अवैध वाळू प्रतिबंधक पथकाने मध्यरात्री तीन टिप्पर पकडले. पथकाने शासकीय वाहनाऐवजी खासगी वाहनांचा वापर करत, तीन ते चार तासांच्या निर्जन ठिकाणी कारवाई केली.
देऊळगाव राजा : तालुक्यातील सिंनगाव जहागीर येथे महसूल विभागाच्या अवैध वाळू प्रतिबंधक पथकाने धडाकेबाज कारवाई करीत (ता.५) च्या मध्यरात्री तीन टिप्पर पकडले. सदर तीनही टिप्पर पुढील दंडात्मक कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अटकाव करण्यात आले आहे.