Bribery Case : राज्यातील लाचखोरीत महसूल विभाग गब्बर! तीन महिन्यात २१२ प्रकरणांत ३०८ कर्मचाऱ्यांवर गुन्हे
Revenue Department : राज्यातील महसूल विभागातील लाचखोरीची प्रकरणे सर्वाधिक असून, चार महिन्यांत ३०८ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. लाच घेतल्याशिवाय फाईल न हलवण्याचा नवा ट्रेंड वाढत असल्याने भ्रष्टाचार गंभीर स्वरूप घेत आहे.
अकोला : राज्यातील सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाय लाचखोरीच्या दलदलीत चांगलेच रुतत चालले आहे. टेबल खालून घेतल्याशिवाय फाईल पुढे सरकवायची नाही, हा नवीन पायंडा कर्मचाऱ्यांमध्ये रुजत चालल्याने भ्रष्टाचार फोफावत चालल्याचे दिसून येत आहे.