- श्रीकांत राऊत
अकोला - वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. विशेषतः भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला महिन्याच्या पगाराचा निम्मा हिस्सा फक्त घरभाड्यासाठी खर्च करावा लागत आहे. उर्वरित पैशांत रोजच्या गरजा, मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च आणि बचत सांभाळणे मोठे आव्हान बनले आहे.