Road Accident : दोन दुचाकींच्‍या अपघातात एक ठार; मृताच्या कंबरेला सापडला खंजीर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident logo

दुचाकींच्‍या अपघातात एक ठार; मृताच्या कंबरेला सापडला खंजीर!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देऊळगाव राजा : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास सिंदखेड राजा मार्गावरील नमन कॉटन समोर घडला.

प्राप्त माहितीनुसार, सिंदखेड राजा मार्ग असलेल्या नमन कॉटन जिनिंग समोर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या. या अपघातात गणेश दामोदर गायकवाड (वय ३०, रा. खट्याळ गव्हाण) हा जागीच ठार झाला तर भगवानराव आढाव (वय ४०) हे गंभीर जखमी झाले. अपघात रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती मिळताच माळीपुरा व त्र्यंबकनगर येथील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

हेही वाचा: Petrol-Diesel Price : कर कमी करण्यासाठी नागपुरात आंदोलन

युवकांच्या मदतीने शासकीय रुग्णवाहिकेने मृत गणेशला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तर गंभीर जखमी भगवानराव आढाव यांना नातेवाइकांनी जालना येथे हलविले. मृत गणेश याच्या कंबरेला खंजीर आढळल्याची चर्चा अपघात स्थळी जमलेल्या नागरिकांमध्ये होती. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता खंजीर सापडला नाही. मृत गणेशकडे खंजीर अथवा कोयता सारखं शस्त्र होते अशा चर्चेला पोलिसांनी ही दुजोरा दिला आहे.

loading image
go to top