Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Rohit Shetty house firing Lawrence Bishnoi gang link : मुंबईत दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारी धमकीची पोस्ट व्हायरल. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित अकोल्यातील शुभम लोणकरचा सहभाग असल्याचा दावा; मुंबई पोलिसांचा तपास वेगात सुरू.
Rohit Shetty House Firing Case

Rohit Shetty House Firing Case

sakal

Updated on

अकोला : मुंबईतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून, या गंभीर घटनेची जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित शुभम लोणकर याने ही जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावचा रहिवासी असल्याने जिल्ह्यातही एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा जिल्हा पोलिसांकडून अधिक तपास सुरू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com