अकोला - जुन्या वैमनस्यातून ‘रिपाई’ (आठवले) विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रोहित वानखडे यांच्यावर दोघांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी (ता.६) खडकी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.