
अकोला ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अकोला : कोविड संक्रमणाचा (Covid infection) वेग वाढत असून त्यासाठी चाचणी, संपर्क चाचण्या तसेच उपचार सुविधा उपलब्धते सोबतच ग्रामीण भागात कोविड लसीकरणाचा (Covid vaccination) वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणांनी उपाययोजना कराव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा(Nima Arora) यांनी शनिवारी (ता. ८) येथे दिले.
हेही वाचा: मांजाने चिरला बँक अधिकाऱ्याचा गळा...
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो-पटोकार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. अनुप चौधरी, डॉ. मनीष शर्मा, डॉ. आदित्य महानकर तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य यंत्रणेतील, शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: पोटासाठी ‘डोंग्या’तच थाटला विष्णूने संसार
जिल्ह्यात १५ ते १७ वयोगटातील युवक-युवतींचे लसीकरण सुरु असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी १५ जानेवारी पर्यंत सर्व शाळानिहाय लसीकरण सत्र आयोजित करुन लसीकरण करावे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, लसीकरण डोसेस व अन्य सामुग्रीचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले. अनेक लोकांचे पहिले डोस घेऊन झाले मात्र दुसरे डोस घेण्याची वेळ येऊनही लसीकरण झालेले नाही, अशा लोकांना संपर्क करुन त्यांचा दुसरा डोस पूर्ण करून घ्यावा. तसेच ग्रामीण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दुसरा डोस घेण्याबाबत लोकांना आवाहन करुन त्यांचे लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
Web Title: Rural Akola Areas Vaccination Speed Up District Collector Orders
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..