मांजाने चिरला बँक अधिकाऱ्याचा गळा...

बेसा चौकातून जात असताना अचानक त्यांच्या गळ्याला मांजा अटकला...
nylon manja Chirala the bank officer Throat
nylon manja Chirala the bank officer Throatsakal

नागपूर : रस्त्याने जात असताना नायलॉन मांजा(nylon manja) गळ्यात अडकल्याने एका निवृत्त बँक अधिकाऱ्याचा (bank officer) गळा कपल्याची घटना बेसा चौकात घडली. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. घटनेच्यावेळी निवृत्त बँक व्यवस्थापक प्रकाश पोटे (६२)(Prakash Pote) हे आपल्या नातेवाइकांची भेट घेऊन घरी जात होते. थंडीमुळे त्यांनी आपल्या गळ्यात मफलर बांधला होता. बेसा चौकातून जात असताना अचानक त्यांच्या गळ्याला मांजा (manja throat)अटकला. काही कळण्याआधीच नायलॉन मांजाने मफलर कापून त्यांचा गळा चिरला.

nylon manja Chirala the bank officer Throat
सिनेमागृहांवर निर्बंध; ५० टक्क्यांची मर्यादा

पोटे यांच्या लक्षात हा प्रकार येईपर्यंत त्यांचा गळा रक्तबंबाळ झाला होता. लगेच त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या गळ्यावर ७ टाके लावले. नायलॉन मांजा बाळगण्यास आणि विकण्यास प्रतिबंध असतानाही पतंग उडविणाऱ्यांच्या हातात नायलॉन मांजा येतो कुठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी विक्रेत्यांसोबतच नायलॉन मांजाने पंतग उडविणाऱ्यांवर देखील कारवाई करायला हवी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नागपुरात मांजाने घेतले ३८ बळी

गेल्या १५ वर्षांच्या आकडेवारीकडे लक्ष वेधल्यास राज्यभरात १८२ जणांचे नायलॉन मांजाने बळी घेतले आहे. तर उपराजधानीत ३८ जणांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे. पशू-पक्षांसह मानवासाठी प्राणघातक असलेल्या मांजावर संपूर्णपणे बंदी घालणे आवश्‍यक आहे. अन्यथा धागा मांजाच्या नावावर चक्क नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com