
अकोला : उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळांपासून दिलासा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी मंजूर केलेल्या पाणीटंंचाई निवारणाच्या २३४ उपाययोजनांपैकी १५२ उपाययोजनांची कामे २ जूनपर्यंत पूर्ण झाली आहेत. ८२ कामे प्रगतीपथावर असून १५२ कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केला आहे. त्यामुळे टंंचाई निवारणाची कामे काही कामे कागदावरच असून सदर कामे पूर्ण होणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे.