esakal | श्रींचा १११ वा ऋषीपंचमी सोहळा होणार भक्तांविनाच
sakal

बोलून बातमी शोधा

शेगाव : श्रींचा १११ वा ऋषीपंचमी सोहळा होणार भक्तांविनाच

शेगाव : श्रींचा १११ वा ऋषीपंचमी सोहळा होणार भक्तांविनाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेगाव (जि. बुलडाणा) : शासनाचे नियम व अटीचे पालन करून यावर्षीही शनिवारी (ता. ११) श्रींचा ऋषीपंचमीदिनी निघणारा पालखी सोहळा निघणार नाही. समाधी सोहळा सलग दुसऱ्या वर्षी संतनगरीत भक्तांविनाच साजरा होणार आहे.

८ सप्टेंबर १९१० (ऋषीपंचमी तिथीला) रोजी सदगुरू श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली होती. तिथीनुसार ऋषीपंचमीला महाराजांच्या समाधीला १११ वर्षे पूर्ण झाली. दोन वर्षांपासून शासनाच्या विविध निर्बंधामुळे वर्षभरापासून श्रींचे उत्सव बंद आहेत. कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासन नियमाचे पालन करीत भाविक भक्तांनी घरीच श्री गजानन महाराजांचे पूजन करावे, जिथे आहात तेथूनच श्रींचे दर्शन घ्यावे, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळावा, गर्दी करू नये, असे आवाहन श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा: भाजपवर आरएसएसचा नव्हे तर अदाणी-अंबाणीचा अंकुश

श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनानंतर हा पहिला गजानन महाराज पुण्यतिथीचा सोहळा आहे. त्यामुळे ऋषीपंचमीदिनी शिवशंकरभाऊ पाटील यांची आठवण भक्तांना आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र तथा श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात देवस्थानचा कारभार सुरू आहे.

loading image
go to top