esakal | भाजपवर आरएसएसचा नव्हे तर अदाणी-अंबाणीचा अंकुश
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपवर आरएसएसचा नव्हे तर अदाणी-अंबाणीचा अंकुश

भाजपवर आरएसएसचा नव्हे तर अदाणी-अंबाणीचा अंकुश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आर्वी (जि. वर्धा) : शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या मोदी सरकारने नुकतीच कच्या तेलाची आयात केली. हा तेल अदाणी, अंबाणी यांच्या रिफायनरी फॅक्टरीमधून शुद्धीकरण होऊन निघेल आणि नंतरच तुमच्या हातात पडेल. तत्पूर्वी, तुम्हाला हात सुध्दा लावता येणार नाही. पहिले भाजपवर आरएसएसचा अंकुश होता. आता अदाणी-अंबाणीचा अंकुश आहे. ते म्हणतील तेच या देशात घडेल, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी तीन कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळ जगताप यांच्या नेतृत्वात निघालेल्या सायकल रॅलीला हिरवी झंडी दाखविण्यासाठी ते गुरुवारी (ता. नऊ) येथे आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.

हेही वाचा: देवानंदचा १३५ दिवस मृत्यूशी संघर्ष; धोका टळलेला नाही

केंद्र सरकारने आणलेले तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असून, व्यापाऱ्यांच्या हिताचे आहे. यामुळे देशातील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पडतील आणि व्यापाऱ्यांच राज्य येईल. अडाणी-अदाणी सारखे व्यापारी आपसात रिंग तयार करून कवडी मोलाने शेतकऱ्याच्या मालाचे दाम लावतील आणि शेतकरी काहीच करू शकणार नाही. तब्बल नऊ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या मध्यमातून लढा देत आहे. प्रचंड संख्येने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभे केलेले हे जगातील एकमेव आंदोलन आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.

शेतकऱ्यांनी आता गप्प बसण्याची गरज नाही

एकीकडे मोदी मेक इंन इंडिया म्हणातात दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडण्यासाठी विदेशातून मालाची आयात करतात. पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट चालविली जात आहे. देशातील शेतकरी नाडवले जात आहे. शेतकऱ्यांनी आता गप्प बसण्याची गरज नाही. लढा अधिक तीव्र करावा लागेल. आरपारची लढाई लढण्याची गरज आहे. या लढाईत सर्वांत पुढे राहणाऱ्याच नाव बच्चू कडू राहील असे ते म्हणाले.

हेही वाचा: देशात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य; पण कशात वाचा...

सायकल चालवून दिले प्रोत्साहन

राज्याचे कृषी मंत्री बच्चू कडू यांनी हिरवी झंडी दाखविल्यानंतर बाळ जगताप यांच्या नेतृत्वात निघालेल्या सायकल रॅलीत ते स्वत: सायकल चालवत सहभागी झाले होते. यामुळे कार्यकर्त्यांना चांगलेच प्रोत्साहन मिळाले. शिवाय त्यांचा उत्साह सुध्दा वाढला. बाळ जगताप यांच्यासह रॅलीत अरसलान खान, सय्यद जुनेद, हरी कळसकर, राजू तेलखेडे, विक्रम भगत, मनोहर उईके, गड्डु, गाडगे, नजीर, विशाल देशमुख अक्षय भोले आदी प्रहारचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

loading image
go to top